सायखेडा : भेंडाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली खालकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळते सरपंच स्वाती कमानकर यांनी आवर्तन पद्धतीने आपला राजीनामा दिल्याने सरपंचपदाची जागा रिक्त होती.रिक्त जागेवर वैशाली खालकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. तांबे यांनी वैशाली खालकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सरपंच पदाच्या अर्जावर सूचक म्हणून मुक्ता शिंदे, तारा अनुमोदक म्हणून गोरख खालकर यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी वैशाली खालकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, महिला सरपंच म्हणून गावाची जबाबदारी पार पडताना गावातील सर्व स्तरावरील नागरिकांना समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आणि गावाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना शासन स्तरावर पाठपुरावा करून राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य शोभा कमानकर, मुक्ता शिंदे, गोरख खालकर, लता खालकर, रावसाहेब लहांगे, स्वाती कमानकर, छगन खालकर, शैलेश शिंदे उपस्थित होते.
भेंडाळीच्या सरपंचपदी वैशाली खालकर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 9:27 PM