वैतरणानगर : मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण ९८.७० टक्के भरले असून, मंगळवारी ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अप्पर वैतरणा धरण एक महिन्याने उशिरा भरले आहे. तीन सांडव्याचे एक फूट गेट उचलत १८६५ क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला असून, कालव्याद्वारे ४५० क्यूसेक्सने विसर्ग करण्यात आला आहे. धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांची अखेर चिंता मिटली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत सुरुवातीपासूनच धरण क्षेत्रात मुसळधार पावसासह संततधार सुरू आहे.
धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून, धरणामध्ये पाण्याचे आवक सुरूच आहे. धरण क्षेत्रात पाण्याचे आवक वाढल्यास सांडव्याद्वारे आणखी विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो, असा अंदाज असून, त्यादृष्टीने वैतरणा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी एक यांनी नीलेश वन्नेरे, शाखा अभियंता भूषण दळवी आदींसह कर्मचारी लक्ष ठेवून असून, योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
-----------------------------------
अप्पर वैतरणा धरण ओव्हरफ्लो दिनांक
मागील वर्षी दिनांक : ३०-८-२०२०, यावर्षी १४/९/२०२१
पाणी पातळी : १९७९.६५ फूट
उपयुक्त पाणीसाठा : ३२७.०६ द.ल.घ.मी.
एकूण पाणीसाठा : ३४९.७१ द.ल.घ.मी.
टक्केवारी : ९८.७०
आजचा पाऊस : ७३ मिमी
यावर्षी एकूण पाऊस : २२०० मि.मी.
मागील वर्षीचा एकूण पाऊस २३२२ मिमी
---------------------
फोटो - अप्पर वैतरणा धरण तुडुंब भरले असून, धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून १८६५ क्यूसेक्सने सुरू असलेला विसर्ग. (१४ वैतरणा)
140921\14nsk_29_14092021_13.jpg
१४ वैतरणा