नाशिक : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश बुधवारी (दि. २२) नाशिकमध्ये आणण्यात येणार असून, शुक्रवारी (दि.२४) अस्थिविसर्जन करण्यात येणार आहे.
वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांचे अस्थी देशभरातील पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करण्यात येणार आहेत. त्यासाठी बुधवारी (दि. २२) सायंकाळ सात वाजेपर्यंत मुंबईत अस्थी आणण्यात येणार आहेत. त्यानंतर ते पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार शहराध्यक्ष बाळासाहेब सानप आणि भाजपाचे चिटणीस लक्ष्मण सावजी हे नाशिकला आणतील त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कलश नाशिकच्या भाजपा मुख्य कार्यालयात आणण्यात येईल. येथे अस्थिकलश गुरुवारी (दि. २३) दिवसभर ठेवण्यात येणार असून, सर्व नागरिकांना अस्थिकलशाचे दर्शन घेता येईल.
शुक्रवारी (दि. २४) सकाळी रामकुंडावर विसर्जन करण्यात येणार आहे, असे भाजपाचे चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी सांगितले.