देवगाव : वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी लातुर येथे ३ जून २०१८ रोजी झालेला वडार समाज महामेळावा, त्यानंतर शासन दरबारी वारंवार पाठपुराव्यानंतर समाजाच्या लढ्यास यश आले असून मुंख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाने केलेल्या बहुतेक मागण्या मान्य करत अंमलबजावणी संदर्भात सुचना दिल्या असल्याची माहिती मेळावा समन्वय समिती सदस्य राजू जाधव व रवि शिंदे यांनी दिली आहे.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी यांच्या उपस्थितीत नुकतीच याबाबत चर्चा झाली. त्यात समाजाच्या विविध मागण्या मान्य करतानाच संबंधित सर्व विभागातील अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत प्रामुख्याने,पंतप्रधान गृहनिर्माण योजनेसाठी विशेष पॅकेज देण्यात येणार असून वडार समाज बांधव जेथे राहतो ते गायरान असो, महानगर पालिका हद्द, सदर जागा रहिवास ठिकाणी ५०० स्क्वेअर फुटापर्यंत देण्यात येईल.वडार समाजास खास रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मजुर सोसायट्या नव्याने निर्माण करणार असून त्यांना राखीव कामे ठेवावीत. तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत वडार वस्ती सुधार योजना मंजुर करण्यात आली असून पुणे येथे विशेष निवासी वसतीगृह मंजुर करण्यात आले आहे. शिवाय,जिल्हा स्तरावर जातीच्या प्रमाण पत्राचे शिबीर लावण्यासही मान्यता देण्यात आली आहे. वराह पालनासाठी विशेष अनुदान देण्यात येणार असून यासंदर्भात लवकरच अध्यादेश निघणार असल्याची माहिती राजू जाधव व रवि शिंदे यांनी दिली. बैठकीप्रसंगी पिराजी मामा मंजुळे, बाबासाहेब धोत्रे, दयाभाऊ ईरकल,अर्जुन धोत्रे, रवि शिंदे, राजू जाधव, बलराज वारकर, सदाशिव जाधव, राकेश विटकर, दिलीप गुंजाळ, अनिल शेलार, शामराव पवार, प्रा.संजय शिंदे आदी उपस्थित होते.अनेक योजनांचा मिळणार लाभमहाराष्ट्रात अधिकृत वडार कामगार म्हणून नोंदणी करून घेणे, वडार कामगार नोंदणी केल्यानंतर खास वडार समाजासाठी विद्यार्थी योजना,आरोग्य योजना,अपघात योजना,लग्न कार्यासाठी अशा अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे.
वडार समाजाच्या बव्हंशी मागण्या मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 4:35 PM
मंत्रालयात बैठक : समन्वय समिती सदस्यांनी दिली माहिती
ठळक मुद्देपंतप्रधान गृहनिर्माण योजनेसाठी विशेष पॅकेज देण्यात येणार असून वडार समाज बांधव जेथे राहतो ते गायरान असो, महानगर पालिका हद्द, सदर जागा रहिवास ठिकाणी ५०० स्क्वेअर फुटापर्यंत देण्यात येईल