लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांना डी.लीट. देऊन सन्मानित करावे व विद्यापीठातील कर्डक अध्यासनाच्या माध्यमातून वर्षभर विविध सांस्कृतिक उपक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, संमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेत, अशी मागणी लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक कार्याध्यक्ष शरद शेजवळ यांनी एका निवेदनात केली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले आहे. भारतीय संविधानिक मूल्य विचार आपल्या साहित्य कवण गीतातून लोकमानसात रुजविणारे महाकवी वामनदादा कर्डक यांना मुक्त विद्यापीठाने डी.लीट. देऊन सन्मानित करणे व विद्यापीठातील कर्डक अध्यासनाच्या माध्यमातून दादांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (सन २०२१-२२) ह्या वर्षभरात विविध उपक्रम, परिसंवाद, संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर शरद शेजवळ यांचेसह ॲड. अरुण दोंदे, ॲड. शरद कोकाटे, सुभाष वाघेरे, प्रवीण कर्डक, देवीदास कर्डक, शैलेंद्र वाघ, महेंद्र गायकवाड, प्रा. एम. पी. गांगुर्डे, वनिता सरोदे-पगारे, कुलदीप दिवेकर, अतुल डांगळे, प्रा. नितीन केवटे, प्रा. के. एस. केवट, उमेश गांगुर्डे, गणेश गांगुर्डे, दीपक शिंदे, नीलिमा गाडे, सागर पगारे, सचिन शिराळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.