देवळा : देवळा तालुका हा अवर्षण प्रवण प्रदेश, पावसाचे प्रमाण अत्यल्प, यामुळे सतत दुष्काळ सदृश परीस्थिती. सद्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे नाल्यांतून वाहणारे पाणी लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम तालुक्यातील वाजगाव येथील शेतकº्यांनी सुरू केले आहे.परीसरात पडणार्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून पाणी तेथे वनराई बंधारा हा संकल्प ठेवून दुष्काळावर मात करण्याचा निश्चय वाजगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे.गत सहा ते सात दिवसापासून वाजगाव व परिसरात सुरु असलेली रिमझिम पाऊसाच्या सरी पडल्याने काही पाणी जमिनीत मुरले, पण डोंगर उतारावरील पाणी नाल्याद्वारे वाहून जाते. नाल्यांचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरवल्यास त्याचा शिवारात फायदा होईल म्हणून, शासनाचा एक रु पयाही निधी न घेता श्रमदानातून व लोकसहभागातून जल युक्त शिवार अभियानांतर्गत वाजगाव येथील शेतकऱ्यांनी नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी वनराई बंधारा बांधून अडवण्याचे काम सुरू केले आहे.वाजगाव येथील शिवशी शिवारात असलेल्या नाल्यावर श्रमदानातून अशोक महाले, बापू देवरे, विजय आहेर, शिवाजी आहेर, राजेंद्र महाले, गोरख बच्छाव आदि शेतकर्यांनी प्लास्टिकच्या गोण्या मातीने भरून वनराई बंधार्यातून वाहून जाणारे पाणी अडवले आहे. अश्याप्रकारे वाहून जाणारे पाणी सर्वानीच अडवल्यास येणाº्या काळात पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. शिवारातही पाण्याची कमतरता जाणवणार नाही. कमी पाऊसात वनराई बंधार्याची मदत मिळणार अशी शिवारासह गावात चर्चा आहे.विहीरी लवकरच तळ गाठतातवाजगावचे ५०टक्के जमिन क्षेत्र चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येते. परंतु कालव्याला नियमति आवर्तन नसल्यामुळे कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर लाभक्षेत्रातील विहीरी लवकरच तळ गाठतात. यामुळे पाणी टंचाई निर्माण होउन पीके सोडून द्यावी लागतात.वनराई बंधार्यांमुळे परिसरात शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण होउन शेतीसाठी सिंचनाची सोय होत असल्याचा अनुभव गतवर्षी आल्यामुळे वाजगाव येथील शेतकरी आता दरवर्षी नाल्यावर वनराई बंधारे बांधण्यावर भर देउ लागले आहेत.
वाजगावला लोकसहभागातून वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 6:28 PM
देवळा तालुका हा अवर्षण प्रवण प्रदेश, पावसाचे प्रमाण अत्यल्प, यामुळे सतत दुष्काळ सदृश परीस्थिती. सद्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे नाल्यांतून वाहणारे पाणी लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम तालुक्यातील वाजगाव येथील शेतकº्यांनी सुरू केले आहे.
ठळक मुद्देपाणी वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग