विंचूर : येथे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अठरा गुन्हे दाखल करूनतीन दुचाकी व एक चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे तसेच वीस दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. वेगवेगळ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतबावीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनासारख्या महामारी रोगाला आळा बसावा यासाठी शासनाने देशाततसेच राज्यात लॉकडाउन केलेले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ३ मेपर्यंत संचारबंदीचा आदेश जारी केलेला असतानाही नागरिक विनाकारण घराच्या बाहेर फिरताना दिसत आहे. नागरिकांना पोलिसांकडून वारंवारसांगूनही नागरिक विनाकारण फिरत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी व निफाडच्या प्रांतधिकारी डॉ. अर्चना पाठारे यांनी लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना आदेश करत विंचूर व परिसरात कारवाईचे आदेश दिले.
विंचूरला विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:08 PM