उमराणे : चणकापुर झाडी एरंडगांव उजवा कालव्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत वापरला जातो. या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत. यापुढील निवडणुकांवर बिहष्कार टाकण्याचा व गांवबंदीचा निर्णय तिसगांव (ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.हनुमान मंदिरात झाडी एरंडगांव कालवा संदर्भात ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थांची बैठक झाली. पंचेचाळीस वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा काम कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता कायम करत असते. हा कालवा या भागातील जनतेसाठी एक दिवास्वप्न बनला आहे. चणकापूर ते झाडी एरंडगाव उजवा कालवा गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने निवडणुकींच्या माध्यमातून पुढे सरकत आला आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समतिी किंबहुना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही कालवा पूर्णत्वाचे स्वप्न राजकीय मंडळींनी दाखिवले आहे. पाण्याच्या अपेक्षेवर या भागातील जनता निवडणुकांत जो उमेदवार जास्त प्रभावीपणे कालवा पूर्णत्वाचा प्रश्न जनतेसमोर मांडेल त्याला आजपर्यंतच्या निवडणुकांत निवडून दिले आहे. परिणामी हा कालवा जणू राजकीय मंडळींना निवडणुकीचे भांडवल म्हणून बनला आहे. खडतर प्रवासातून मार्गक्र मण करणार्या पुनद प्रकल्पांतर्गत चणकापूर ते झाडी एरंडगाव या ?? कि.मी. अंतराच्या कालव्याचा इतिहासात बघता जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव आदी दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम या उजव्या कालव्याला मंजुरी मिळाली होती. कालव्याचे काम पूर्ण होऊन पाणी मिळावे यासाठी उमराणे, चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, झाडी, तिसगाव, वर्हाळे, सावकारवाडी, एरंडगाव आदी गावांतील जनतेकडून शासनाकडे अनेकवेळा मागणी केली. परंतु शासनाने याची फारशी दखल घेतली नाही. दहीवड ते झाडीपर्यंतचे अपूर्णावस्थेतील काम लवकर पूर्ण केले तरच खर्या अर्थाने अवर्षण प्रवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्या देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याची चव चाखायला मिळेल. या प्रश्नाचे राजकीय भांडवल करत निवडणुका लढविल्या जात आहेत. दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी लोकप्रतिनिधी फारसे लक्ष देत नाहीत असा विचार बैठकीत मांडण्यात आला. या झाडी एरंडगांव उजवा कालवा कामाच्या पुर्ततेसाठी अखेर ग्रामस्थांनी आगामी काळातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समतिी, ग्रामपंचायत निवडणुकींवर बिहष्कार टाकण्याचा व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस सरपंच दत्तु आहेर, बाजार समतिीचे उपसभापती महेंद्र पाटील, माजी सरपंच देवा वाघ, बाजार समतिी संचालक बाळासाहेब आहेर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.