जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना दत्तात्रय दवंगे, उपसरपंचपदी नितीन सुभाष लभडे यांची निवड झाली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते.अर्ज भरण्यासाठी दिलेल्या वेळेत सरपंचपदासाठी वंदना दवंगे आणि स्वप्नाली लभडे यांनी अर्ज दाखल केले. त्यापैकीकोणीही माघार न घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली. यामध्ये वंदना दवंगे यांना नऊ मते, तर स्वप्नाली लभडे यांना एकही मत मिळाले नाही.उपसरपंचपदासाठी नितीन लभडे व जितेंद्र लभडे यांचे अर्ज दाखल झाले. पण जितेंद्र लभडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने नितीन लभडे बिनविरोध निवडले गेले. ग्रामपंचायतीत माजी सरपंच नवनाथ लभडे यांच्या १५ वर्षांच्या सत्तेला साईसेवा पॅनलने आव्हान देऊन ११ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला होता. तर नवनाथ लभडे यांच्या जनसेवा पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.या निवडणुक प्रसंगी मनीषा लभडे, वाळु दिवटे, किरण लभडे, वाल्हूबाई लभडे, जितेंद्र लभडे, शैला खळे, मनीषा मोरे आदी सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. आर. शर्मा, तलाठी डी. एस. गिरी, ग्रामविकास अधिकारी महेश महाले यांनी काम बघितले.
निमगाव मढच्या सरपंचपदी वंदना दवंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:51 PM
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना दत्तात्रय दवंगे, उपसरपंचपदी नितीन सुभाष लभडे यांची निवड झाली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते.
ठळक मुद्देउपसरपंचपदी नितीन सुभाष लभडे यांची निवड झाली.