नाशिक : शहरातील सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. वात्सल्य परिवार फाउंडेशन संचलित वात्सल्य वृद्धाश्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी आंबेडकरांच्या जीवनावर भाषणे केली. यावेळी राजेश पाटील व संगीता खैरनार यांनी प्रतिमापूजन केले. संस्थेचे अध्यक्ष सतीश सोनार यांनी आभार मानले.निरीक्षणगृहभीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निरीक्षणगृहात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गं. पां. माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक हेमलता पाटील, वैशाली भोसले, अॅड. श्यामल दीक्षित, चंदुलाल शहा आदी उपस्थित होते.दरम्यान, पीठगिरणी कामगार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आसिफखान, हबिब खान, बाळू गवळी, काशीनाथ नाटकर, छाया बिडलॉन, रेखा शेलार आदी उपस्थित होते.वस्तू व सेवाकर कार्यालयराज्य शासनाच्या वस्तू व सेवाकर कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कर उपायुक्त श्रीकांत गांगुर्डे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कर उपायुक्त घोडे, सहायक आयुक्त शिरसाठ उपस्थित होते. प्रास्ताविक अविनाश आहेर यांनी केले. डी. एस. गांगुर्डे यांनी आभार मानले.शिल्पकार विकास संस्थाआशापुरा हौसिंग सोसायटी, धात्रकफाटा, पंचवटी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी, शाहू, फुले, आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राजेंद्र बर्वे, कैलास केदारे, संजय शिरसाठ, राहुल सम्राट, मुकेश गोराडे, अमित पाटील, अजय खोकले, संगीता काळे, सुनीता घोटेकर, जयश्री शिरसाठ, चित्रा केदारे, प्रणाली बर्वे, अशोक महिरे, दत्तात्रेय जगताप, विजयकुमार मोरे, अभिजित गांगुर्डे, संकेत शिरसाठ आणि आकाश केदारे आदी उपस्थित होते.
वंदना माझी, तुला भीमराया़़़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:12 AM