वणी : परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुमारे दिड तास मुसळधार पाऊस झाल्याने जगदंबा देवी मंदीर परिसरातील दुकानांमधे पाणी शिरले. लेंडि नाल्यावरु न सुमारे चार फुट पाण्याचा प्रवाह वाढल्याने काही वेळ संपर्क तुटला तर मंदीर प्रवेशद्वाराच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला. सुरु वातीपासुनच पावसाने रौद्र रूप धारण केले होते. शहरातील प्रमुख भागात पाणी साचले होते. उपबाजारात कांदा खरेदी विक्र ी व्यवहारावर परिणाम झाला. खरेदी केलेले कांदे चाळीत साठवणुकीसाठी नेताना तारांबळ उडाली. बाजारतळात गुडघाभर पाणी साचले होते तर खंडेरावनगर भागात पाण्याचा धोकादायक पद्धतीने प्रवाह होऊ लागल्याने रहिवाशांमधे भितीचे वातावरण होते. कारण भुतकाळात पुराचे पाणी या भागात शिरले होते. तेव्हा जीव वाचविण्यासाठी घरेदारे सोडून खंडेराव मंदिराचा आसरा रहिवाशांनी घेतला. त्याची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती रहिवाशांपुढे उभी ठाकली होती. सद्यस्थितित नदीपात्रालगतच्या अडथळ्यांमुळे पाण्याच्या प्रवाहाला अवरोध निर्माण झाल्यामुळे रहिवाशी चिंतीत झाले होते. दरम्यान देवी मंदीर परिसरातील रखिबचंद बोथरा यांच्या दुकानात पाणी शिरल्याने आर्थिक हाणी झाली. दिलीप बोथरा यांचे घरात पाणी शिरल्याने सुमारे पन्नास हजार रु पयांच्या किराणा मालाचे नुकसान झाले. संजय पलोड, डॉ. महेन्द्र भुतडा व या भागातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले तर मंदीर परिसरातील काही दुकानेही पुराच्या तडाख्यात सापडली.
वणी परिसराला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 4:57 PM