विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच याप्रसंगी तंबाखूमुक्त अभियानांतर्गत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शपथ घेतली.कार्यक्र माच्या प्रारंभी प्रतिमापूजन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक व्ही. व्ही. मापारी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक यू. बी. वर्पे, पी. बी. आहेर, ग्रामस्थ अण्णासाहेब दरेकर उपस्थित होते. दिव्या दरेकर, सोनल आव्हाड, साहिल दरेकर, प्रिती कदम, श्रुती डुंबरे, शुभम सोनवणे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तंबाखूमुक्त अभियानांतर्गत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शपथ घेतली.कार्यक्र माचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख के. एम. निकम यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थीनी कोयल साळवे हिने, तर आभार प्रदर्शन उपशिक्षक जे. पी. पाटील यांनी केले. यावेळी प्राचार्य एन. ई. देवढे, उपप्राचार्य प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस. पी. पगार, आर. के. चांदे आदी उपस्थित होते.
विंचूर विद्यालयात तंबाखू मुक्त शाळाची प्रतिज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 7:40 PM
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच याप्रसंगी तंबाखूमुक्त अभियानांतर्गत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शपथ घेतली.
ठळक मुद्दे याप्रसंगी तंबाखूमुक्त अभियानांतर्गत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शपथ घेतली.