पेठ : सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यात सुरू असलेल्या मिशन जलपरिषद अंतर्गत आडगाव येथील ग्रामस्थांनी श्रमदान करत मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. यावेळी ग्रामस्थांनी श्रमदानातून गायमुख ओहळावर तीन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे.
पेठ तालुक्यातील गायमुख ओहळावर आडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नेताजी गावीत यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या श्रमदानातून तीन वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. यामुळे काहीअंशी का होईना ते जनावरांच्या तसेच कपडे धुण्यासाठी, शेतीसाठी उपयोगी ठरणारा आहे. गाव परिसरात वनराईसारख्या बंधाऱ्यांची निर्मिती केल्यास उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर थोड्या प्रमाणावर आळा बसणार आहे. आडगाव येथे तीन बंधारे बांधून जलपरिषद मिशन मोहिमेला प्रतिसाद दिला असून, भागातील पाणीटंचाईवर थोड्या प्रमाणावर श्रमदान केले आहे.
याप्रसंगी नेताजी गावीत, योगीराज भांगरे, आनंदा जाधव, रवींद्र दळवी, पुंडलिक गायकवाड, जनार्धन पोटिंदे, मिनानाथ जाधव, कुणाल भांगरे, गोट्या खुरकुटे, वैजल पोटिंदे, अरुण भांगरे, सोपान प्रधान, गोवर्धन भांगरे, रामजी हिरकुड, रवींद्र दळवी, संदीप भांगरे, दशरथ गवळी, अनिल बोरसे, पोपट महाले आदींसह ग्रामस्थ, जलमित्र उपस्थित होते.
फोटो - ०५ आडगाव बंधारा
आडगाव, ता. पेठ येथे वनराई बंधारा बांधताना ग्रामस्थ व जलपरिषद सदस्य.
===Photopath===
051220\05nsk_10_05122020_13.jpg
===Caption===
आडगाव ता. पेठ येथे वनराई बंधारा बांधतांना ग्रामस्थ व जलपरिषद सदस्य.