नाशिक : सामुदायिक विवाह सोहळा संकल्पना ही समाजभिमुख असून या संकल्पनेबाबत कुठलेही गैरसमज बाळगण्याची गरजच नाही. समाजाने हुंडा पध्दत हद्दपार करुन उत्कर्ष घडून आणावा आणि आदर्श अन्य समाजापुढे ठेवावा, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास व महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.सिडको परिसरातील मोरवाडी भागात वंजारी समाज उत्कर्ष मंडळाच्या बुरकुले सभागृहाच्या लोकर्पण गुरूवारी (दि.१२) करण्यात आले. यावेळी मुंडे उद्घाटक म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी आमदार मंगेश सांगळे, कावेरी घुगे, मारुती उगले, अशोक आव्हाड, मनोज बुरकुले, गंगाधर बुरकुले आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुंडे म्हणाल्या, वंजारी समाज उत्कर्ष मंडळाने १९९६ सालापासून वधु-वर सुचक मेळावे आणि नंतर सामुदायिक विवा सोहळे आयोजित करुन वेगळा प्रेरणादायी पायंडा पाडला आहे. निश्चितपणे असे कार्य कौतुकास्पद असून समाजात आज जितका मुलगा शिकलेला तितका ‘रेट’ अर्थात हुंडा जास्त अशी अवस्था निर्माण झाली आहे. मुलीदेखील कुठल्याही क्षेत्रात कमी नसून त्यादेखील उच्चशिक्षित होत आहे. त्यामुळे मुलामुलींनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढल्यास कु ठल्याहीप्रकारच्या अडचणी उद्भवणार नाही. त्यामुळे भेदाभेद न करता समाजातून हुंडापध्दत हद्दपार करण्यासाठी सुशिक्षित आधुनिक प्रगत विचारांच्या तरुण-तरुणींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले. मंडळाच्या वतीने खेडोपाडी सामुदायिक विवाह संकल्पनेचा प्रचार-प्रसाराची मोहीम हाती घेतली असून ही मोहीम कौतुकास्पद असून नक्कीच यशस्वी व समाजहिताची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वंजारी समाजाने हुंडा पध्दत हद्दपार करावी : पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 4:04 PM
सिडको परिसरातील मोरवाडी भागात वंजारी समाज उत्कर्ष मंडळाच्या बुरकुले सभागृहाच्या लोकर्पण गुरूवारी (दि.१२) करण्यात आले. यावेळी मुंडे उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
ठळक मुद्देआदर्श अन्य समाजापुढे ठेवावा