मनसेचे तालुकाध्यक्ष संपत वक्ते, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, भाऊसाहेब कलवर, विकास गोजरे, मंगला वडगे, भागवत झाल्टे, श्रीहरी ठाकरे, राकेश ठाकरे, खंडू खुटे, केशव तासकर आदींसह उर्धुळ गावक-यांनी सदर निवेदन बांधकाम विभागाला दिले. चांदवड तालुक्यातील दक्षिण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. उर्धुळ ते चांदवड हा रस्ता अतिशय खराब झाला असून, उर्धुळ, तिसगाव, परसूल, भोयेगाव, गणूर, दरसवाडी या रस्त्याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती यांना निवेदने देऊनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा डागडुजी होत नाही. या भागातील शेतक-यांना आपला माल तालुक्याच्या ठिकाणी नेण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. रस्त्यांना ब-याच ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने रात्रीच्या वेळेस छोटे-मोठे अपघात नेहमीच घडत असतात. या भागातून शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. या खड्ड्याच्या विळख्यात अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल या निवेदनात करण्यात आला आहे.
उर्धुळ -तिसगाव, गणूर रस्त्यांची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 5:31 PM