लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात एमटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती शिंदे यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ दरम्यान, शासकीय सेवेत असतानाही विनानोंदणी खासगी रुग्णालय सुरू करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस लहाडे यांचा सोमवारी (दि़८) ताबा घेण्याची शक्यता आहे़जिल्हा रुग्णालयात मार्चमध्ये डॉ. वर्षा लहाडे व प्रशिक्षणार्थी डॉ. कमलाकर जाधव यांनी उंबरखेड येथील २४ आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा बेकायदेशीरपणे गर्भपात केला़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एमटीपी कायद्यान्वये डॉ. लहाडे, डॉ. जाधव आणि गर्भवती महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ मात्र त्यापूर्वीच लहाडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला व दरम्यानच्या काळात त्या फरार होत्या़ मात्र सुनावणीदरम्यान, लहाडे यांनी अर्ज मागे घेऊन २८ एप्रिल रोजी सरकारवाडा पोलिसांना शरण आल्या़ न्यायालयाने २९ एप्रिल ते ६ मे या कालावधीत त्यांना पोलीस कोठडी सुनावली़
वर्षा लहाडे यांची कारागृहात रवानगी
By admin | Published: May 08, 2017 1:42 AM