शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

सिन्नरला ‘तीज’ सणानिमित्त विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:18 PM

माहेश्वरी समाजात महत्त्वपूर्ण मानला जाणाºया ‘तीज’ सणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शेकडो माहेश्वरी महिला एकत्र आल्या. ‘जश्न ए सिंजारा’ या हरियाली ‘तीज’च्या कार्यक्रमात विविध स्पर्धेत महिलांनी सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला. ‘ऋतुरंग’ कार्यक्रमात भक्तिभावाबरोबरच माहेश्वरी महिलांनी स्पर्धांचा आनंद लुटला.

सिन्नर : माहेश्वरी समाजात महत्त्वपूर्ण मानला जाणाºया ‘तीज’ सणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शेकडो माहेश्वरी महिला एकत्र आल्या. ‘जश्न ए सिंजारा’ या हरियाली ‘तीज’च्या कार्यक्रमात विविध स्पर्धेत महिलांनी सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला. ‘ऋतुरंग’ कार्यक्रमात भक्तिभावाबरोबरच माहेश्वरी महिलांनी स्पर्धांचा आनंद लुटला.नाशिक जिल्हा माहेश्वरी महिला संघटन अंतर्गत सिन्नर माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महेशमूर्तीच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. माहेश्वरी महिला संघटनेच्या राष्टÑीय उपाध्यक्ष शैला कलंत्री, राष्टÑीय कार्यालयीनमंत्री सुषमा मुंदडा, अखिल भारतीय सुरभी समितीच्या संयोजक कांताजी राठी, जिल्हाध्यक्ष सरला मालपाणी, सचिव स्वाती बूब, सिन्नर महिला मंडळाच्या आजीवन अध्यक्ष वर्षा चांडक, संघटनमंत्री शोभा कलंत्री आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या. २५ जुलै ते १० आॅगस्टपर्यंत माहेश्वरी महिला तीजनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत असतात. यानिमित्ताने पहिल्यांदाच जिल्ह्यातील माहेश्वरी महिलांना एकत्र बोलावून सिन्नरला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून ५६० महिला या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध स्पर्धेत सहभागी झाल्या.‘ऋतुरंग’ कार्यक्रमात माहेश्वरी महिला मंडळाची जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा पार पडली. सामुदायिक नृत्य स्पर्धेत नाशिक, ओझर, त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथील महिला मंडळांनी पारितोषिके पटकावली. उत्कृष्ट वेषभूषा स्पर्धेत सिन्नरने प्रथम क्रमांक मिळविला, तर लासगावला बेस्ट कॉर्डिनेशचे पारितोषिक मिळाले. ‘सब आओ सब जीतो’ या धर्तीवर महिलांना अनेक बक्षिसे देण्यात आली. लकी ड्रॉमध्येही अनेकांना बक्षिसे वितरित करण्यात आली. दिवसभर आयोजित विविध कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातून आलेल्या महिलांसाठी चहा, अल्पोपाहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमात नाशिक, नाशिकरोड, भगूर, त्र्यंबकेश्वर, ओझर, मालेगाव, चांदवड, वावी, इगतपुरी, विंचूर, उगाव, निफाड, पिंपळगाव, सायखेडा या गावांसह जिल्हाभरातून महिला स्वयंस्फूतीने सहभागी झाल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिन्नर महिला मंडळाच्या आजीवन अध्यक्ष वर्षा चांडक, शोभा कलंत्री, किरण नावंदर, कांचन कासट, शशिकला कासट, ज्योती कलंत्री, सुनंदा करवा, शकुंतला जाजू, सोनल मुंदडा, शिल्पा लोया, राशी लढ्ढा, मनीषा चांडक, सीमा टावरी यांच्यासह महिला मंडळाने परिश्रम घेतले. सीमा टावरी व मनीषा चांडक यांनी सूत्रसंचालन केले. स्वागताध्यक्ष वर्षा चांडक यांनी आभार मान् ाले.