पेठ -तालुक्यामध्ये चाणक्य मंडल परिवारातर्फे युवकांचा तीन दिवसांचा आदिवासी भाग अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील युवकांमध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्राबाबत जाणीवजागृती घडवण्याचं काम चाणक्य मंडल परिवाराने केले आहे. याच उपक्र माअंतर्गत पेठ तालुक्यातील दहा गावांमध्ये चाणक्य मंडल परिवारातील विद्यार्थी तीन दिवस राहिले. त्यांनी या आदिवासी भागाचा अभ्यास केला. इथली संस्कृती , परंपरा याबरोबरच इथली प्रशासन व्यवस्था, स्थानिक समस्या यांचा त्यांनी अभ्यास केला . गावकरी तालुका स्तरीय प्रशासन यांच्याशी चर्चा करण्याबरोबरच त्यांनी गावामध्ये वृक्षलगवडीसाठी खड्डे खोदून श्रमदान देखील केले. बोरवठ, हनुमंतपाडा , हनुमाननगर , हरणगाव, बाडगी, कापूर्णे,सुरगाणे, म्हसगण, धानपाडा,कायरे या ग्रामपंचायतीमध्ये सर्व दहा टीम तीन दिवस राहिल्या. बोरवठ गावामध्ये यानिमित्ताने बोरवठ आणि गंगोडबरी येथील आदिवासी कला पथकांनी आदिवासी जनजीवन ,कला ,संस्कृती यांचं दर्शन सर्वाना आपल्या कलेमधून दाखवले. याप्रसंगी गटविकास अधिकारी अनिल नागणे, विस्तार अधिकारी बी.एस. पवार, बी.एस. सादवे, ग्रामसेवक संघटनेचे सचिव बाळासाहेब मगर.गायकवाड,भुसारे, लोहार,नेहेते, जाधव, कोतवाल, अिहरराव, बत्तीसे, तुपे, खबाईत इत्यादी हजर होते. सूत्रसंचालन लोहार यांनी केले व आभार.जाधव भाऊसाहेब यांनी मानले.
चाणक्य मंडळ परिवाराकडून आदिवासी भागात विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 2:05 PM