वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान दिंडोरी तालुका किसान योगा समितीच्या वतीने तालुक्यातील कोरोनायोद्धा डॉक्टर, नर्स, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी योग समितीचे अध्यक्ष वसंतराव उफाडे, संदीप पिंगळ, योगेश मातेरे, नूतन पेढेकर, डॉ. एम. एम. पानगव्हाणे, माजी सरपंच उत्तम दिघे, आर्यन वडजे, निर्मला राजगुरु, लक्ष्मी जगताप, उत्तम उफाडे, सुमित चव्हाण, गणेश भावले, सुनील घुगे, भाऊसाहेब कावळे तसेच नियमित योगसाधना करणारे आबालवृद्ध, महिला उपस्थित होत्या.शारीरिक व मानसिक आरोग्याचे निवारण व्हावे, यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.- नूतन पेढेकर, प्रचारक, किसान योग समिती.
परमोरी येथे विविध कार्यक्रमांनी योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 4:43 PM
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान दिंडोरी तालुका किसान योगा समितीच्या वतीने तालुक्यातील कोरोनायोद्धा डॉक्टर, नर्स, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
ठळक मुद्देतालुक्यातील कोरोनायोद्धा डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींचा सन्मान