नाशिक : शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ ते २३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विकास भागवत यांनी दिली. शिवजन्मोत्सवानिमित्त रविवारी (दि. १८) सायंकाळी ६ वा. शिवाजी पुतळा येथे नंदेश उमप यांचा ‘मी मराठी’ हा कार्यक्रम होईल. सोमवारी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन, सायंकाळी दत्त मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिवसंस्कृती ढोल पथक मिरवणूक, मंगळवारी ‘राजमाता जिजाऊंचे संस्कार’ या विषयावर सिंधुताई सपकाळ, शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे, बाल शिव व्याख्याता ओमकार व्यवहारे यांची व्याख्याने होणार आहेत. बुधवारी शिवशाहीर देवानंद माळी, स्वप्निल डुबरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होईल. गुरुवारी तरंग प्रस्तुत मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम व शिवशाहीर निशान शेख यांचा पोवाड्याचा कार्यक्रम शिवाजी पुतळा येथे होणार आहे, तर शुक्रवारी जेलरोड येथील छत्रपती चौक येथे उदय साटम प्रस्तुत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम होणार आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विकास (बंटी) भागवत, कार्याध्यक्ष सचिन हांडगे, उपाध्यक्ष संतोष पिल्ले, राजेश फोकणे, सरचिटणीस राहुल तुपे, खजिनदार शिवाजी हांडोरे, शिरीष लवटे, किशोर जाचक आदी पदाधिकाºयांनी केले आहे.
शिवजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:58 AM