शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

संविधान दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:28 AM

संविधान दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळांमध्येदेखील कार्यक्रम घेण्यात आले. नाशिकरोड परिसरात शासकीय कार्यालय, मुद्रणालय आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकांचे वाचन करण्यात आले.

नाशिक : संविधान दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळांमध्येदेखील कार्यक्रम घेण्यात आले. नाशिकरोड परिसरात शासकीय कार्यालय, मुद्रणालय आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकांचे वाचन करण्यात आले.  पंचवटी हिरावाडीतील (कमलनगर) येथील जेम्स इंग्लिश मीडियम शाळेत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा हिमगौरी अहेर-आडके यांनी केले. विद्यार्थांसाठी आमचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य या विषयावर निबंधलेखन व प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.  यावेळी शिक्षकांनी भारताचे संविधान विद्यार्थ्यांना वाचून दाखवले व संविधानाचे हक्क, कर्तव्य यांची ओळख करून दिली. कार्यक्र माला शैक्षणिक सल्लागार अनुराधा जैस्वाल, मंजुशा बर्वे, रमा जाधव, वैशाली तंगार आदींसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.धनलक्ष्मी शाळामानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळेत भारताचा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाची ओळख करून देण्यात आली. राज्यघटनेचा आदर करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयविभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी संविधान दिनानिमित्त विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त रघुनाथ गावंडे, सुखदेव बनकर, अर्जुन चिखले, प्रवीण पुरी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.व्यंकटराव हिरे महाविद्यालय४महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर यांनी मार्गदर्शन केले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कुणाल वाघ यांनी उपस्थितांना संविधान शपथ दिली. याप्रसंगी प्रा. डॉ. नारायण गाढे, डॉ. यू. पी. शिंदे, गोविंदराव देशमुख, विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बिंदू रामराव देशमुख महाविद्यालयनाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या बिंदू रामराव देशमुख महाविद्यालयात भारतीय संविधान साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. लिना पांढरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक संजय कीर्तने यांनी केले. याप्रसंगी प्रा. चंद्रकांत गोसावी यांनी संविधानाच्या सरनाम्याचे वाचन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. मीनल बर्वे, प्रा. स्मिता साळवे, प्रा. राजू सानप, प्रा. डॉ. लता पवार, प्रा. तेजेश बेलदार, भाऊराव चव्हाण, राजश्री ठोंबरे, स्मिता जाधव, भिका शेळके, योगेश देशपांडे आदी उपस्थित होते.उंटवाडी माध्यमिक विद्यालयनाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे संविधान दिन मुख्याध्यापक रत्नप्रभा सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापिका प्रियंका निकम यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचे सामूहिक वाचन केले. सुनंदा कुलकर्णी यांनी संविधान दिनाची माहिती सांगितली. याप्रसंगी २६ नोव्हेंबर रोजी आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अशोक कोठावदे, पर्यवेक्षक मधुकर पगारे, शिक्षक प्रतिनिधी दिलीप पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकConstitution Dayसंविधान दिन