नाशिकरोड : सध्या प्रत्येक समाजाने आपापल्या संत, महाराजांना केवळ समाजापुरतेच मर्यादित करून ठेवले आहे. त्यामुळे सर्व समाजाने आपल्या संताना केवळ फक्त समाजापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांची जयंती, पुण्यतिथी सार्वजनिकरीत्या साजरे करावे, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र दराडे यांनी केले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रणित नाशिकरोड नाभिक मंडळाच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांच्या सत्कार-सोहळ्याप्रसंगी दराडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार योगेश घोलप, वरिष्ठ लेखापाल संजय राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, राजेंद्र तुपे, अभिजित सोनवणे, विलास भदाने, अॅड. रामदास बोरसे, प्रेस कामगार नेते भगवान बिडवे, नारायण यादव, सुभाष बिडवई आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी समाजबांधवांकरिता सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले. प्रास्ताविक संजय गायकवाड व आभार रमेश अहेर यांनी मानले.
संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त नाभिक मंडळातर्फे विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:54 AM