नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन वंदन केले.वाल्मीकी टॉट्स शाळावाल्मीकी टॉट्स शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी संचालक सिमांतिनी कोकाटे, संस्थापक सीमा कोकाटे, मुख्याध्यापक मोनिका गोडबोले, व्यवस्थापक सीमा कोतवाल उपस्थित होते.ढगे महाराज ट्रस्टसमर्थ ढगे महाराज ट्रस्टच्या वतीने गोदाघाटावरील ढगे महाराज समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी गणेश पूजन व ढगे महाराजांच्या चरणपादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रतापराव पवार, अनंत ढगे, रमेश कडलग, भाऊसाहेब फुले, लक्ष्मीचंद्र शेंडे, श्रीकांत ढगे आदी उपस्थित होते.महावीर पॉलिटेक्निकमहावीर पॉलिटेक्निक महाविद्यालयात विविध विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रारंभी डीन डॉ. प्रियंका झवर आणि प्राचार्य संभाजी सगरे यांच्या हस्ते सरस्वतीपूजन झाले. यावेळी डॉ. प्रियंका झवर म्हणाल्या, गुरूंच्या सूचनांचे पालन केल्यास यश हमखास मिळते, परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी आदर व्यक्त केला पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने शिक्षणाचे धडे गिरवले पाहिजे. विद्यार्थ्याने स्वावलंबी असणे गरजेचे आहे. यावेळी प्राचार्य संभाजी सगरे, विभागप्रमुख संजय भामरे, विभागप्रमुख रामेश्वर लढ्ढा, प्रा. प्रमोद कांकरिया, हर्षद वाघ, सागर पाटील, प्रा. राजीव शिंदे, प्रा. आदित्य शिंदे, प्रा. वैशाली जाधव, प्रा. सुवर्णा जाधव, प्रा. सोनाली येलमामे, प्रा. श्रुती शिंदे, प्रा. लक्ष्मी राऊत, प्रा. विवेक जाधव, प्रा. के. डी. पाटील आदी उपस्थित होते. प्रा. राजीव शिंदे यांनी आभार मानले.अभिनव शाळा : मखमलाबाद येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बालविकास मंदिर मखमलाबाद येथे गुरु पौर्णिमा व शिक्षक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शालेय समितीचे अध्यक्ष संपत पिंगळे यांच्या हस्ते व्यासपूजा करण्यात आली. कार्यक्र माचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन, तर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. होरायझन अकॅडमीच्या शालेय समितीचे अध्यक्ष संजय फडोळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी विविध गुरू-शिष्य यांच्या वेशभूषेत आलेले होते. अदिती पगार व शीतल पाटील यांनी गुरु पौर्णिमेची माहिती सांगितली. रोहिणी गायकवाड यांनी गुरु द्रोणाचार्य-एकलव्य यांची पौराणिक कथा सांगितली. उच्च माध्यमिक विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष पिंगळे, होरायझन अकॅडमीच्या प्राचार्य नीलिमा घुले, महेश मानकर, शरद तांबे, नारायण पिंगळे, मोतीराम पिंगळे, सुभाष शिंदे, विश्वनाथ पिंगळे आदी उपस्थित होते.
शहरातील शाळांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:56 PM