नाशिक : गोविंदा रे गोपाला..., आज गोकुळात आनंद झाला..., कृष्ण जन्मला गं सखे..., अशा विविध भक्तीपर गीतांनी शहरातील श्रीकृष्ण मंदिरे दुमदुमली. शहर व परिसरात श्रीकृष्ण भक्तांनी कृष्णजन्माष्टमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जात आहे. द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळत आहे. सकाळी मंगल आरती, महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद् भागवत प्रवचन-कीर्तन पार पडले. नऊ ते रात्री अकरापर्यंत महाभिषेक करण्यात येणार आहे. साडेअकरा ते १२ वाजेपर्यंत महाआरती होऊन श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात येईल. सोमवारी सकाळपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महामहोत्सव इस्कॉन मंदिरात पार पडणार आहे. तसेच मंगळवारी (दि.४) संध्याकाळी सात वाजेपासून रात्रीपर्यंत नंदोत्सव साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीनिमित्त मंदिर पूर्णवेळ भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. ‘हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे..’ ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे...’ चा जयघोषाने मंदिर दुमदुमले होते.
जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 6:19 PM
द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळत आहे
ठळक मुद्देस्वामीनारायण मंदिरातही श्रीकृष्ण जन्म सोमवारी रात्री साजरा केला जाणार आहे. सोमवारी अर्धनारीनटेश्वर रूपात येथील भगवान श्रीकृष्णाचे भाविकांना दर्शन घेता येणार