नाशिक : भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पुढाकाराने शनिवारी (दि. २०) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी दुपारी ३.३० वाजता बी.डी. भालेकर मैदान येथून हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते पूजाअर्चा करून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. महापौर अशोक मुर्तडक, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, उपमहापौर गुरुमित बग्गा, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नगरसेवक अर्चना जाधव, त्र्यंबकच्या माजी नगराध्यक्ष अलका शिरसाट आदि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मिरवणुकीत विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट, विश्वकर्मा ज्येष्ठ नागरिक संघटना, जॉँगिड ब्राह्मण समाज सेवा समिती, सुतार समाज सेवा समिती, केवडीबन, महाराष्ट्र विश्वकर्मा सेना, विश्वकर्मा मय पांचाळ सेवाभावी संस्थांसह विविध संस्था सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची सांगता भालेकर मैदानावरच होणार असून, या ठिकाणी महाआरती, मिरवणुकीतील उत्कृष्ट चित्ररथ, उत्कृष्ट संचलन व विशेष सहभागी व्यक्ती संस्था, मंडळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. समाजबांधवांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब खैरनार, सचिव अमरचंद शर्मा, कार्याध्यक्ष रमेश गाडेकर, ओम जांगिड, जेठाराम सुतार, खेताराम सुतार आदिंनी केले आहे. (प्रतिनिधी)
विश्वकर्मा जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
By admin | Published: February 19, 2016 11:22 PM