शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

हनुमान जन्मोत्सवानिमित्त उद्या विविध धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:20 AM

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सव सोहळ्यासाठी मंदिरांना रंगरंगोटी व सजावट करण्यात आली आहे.पंचमुखी हनुमान मंदिरजुन्या आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात येत्या शुक्रवारी (दि.१९) हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महंत भक्तिचरणदास महाराज यांनी दिली आहे. पंचवटीतील जुना आडगाव नाका येथे प्रसिद्ध व प्राचीन श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्र वारी पहाटेपासून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न होतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जन्मोत्सवनिमित्त शुक्रवारी पहाटे ५ वाजता अभिषेक, सकाळी ६ वाजता आरती, सकाळी ७ वाजता सामुदायिक हनुमान चालीसा पठण, सकाळी १० वाजता सुंदरकांड हवन, दुपारी १२ वाजता आरती, सकाळच्या आरतीनंतर दिवसभर लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.नसती उठाठेव मित्रपरिवारनरसिंहनगर, गंगापूररोड येथील नसती उठाठेव मित्रपरिवारातर्फे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध विषयांवर नामवंत वक्त्यांची व्याख्याने होत असून, शुक्रवारी सकाळी ६.२७ वाजता जन्मोत्सव सोहळा होणार आहे. तसेच मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.नंदिनी गोशाळा आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पूर्णाहुती व आरती संपन्न होणार आहे. तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.श्री सिद्ध हनुमान देवस्थान श्रीक्षेत्र अंजनेरी येथे सकाळी ६.१५ वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. तसेच महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.तीन वर्षांची परंपराचौक मंडई, वझरेरोड, फुलमाळी मंच ट्रस्ट, दक्षिणमुखी हनुमान मंदिर जन्मोत्सवासाठी सज्ज झाले आहे. शुक्रवारी सकाळी जन्मोत्सव सोहळ्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या मंदिराला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीला मूर्तीस सोन्या-चांदीचे दागिने व हिरेजडीत रत्नांनी सजविले जाते. जन्मोत्सवासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती फुलमाळी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक वझरे यांनी दिली.समर्थ रामदास स्वामी मठ टाकळीहनुमान जयंतीनिमित्त श्री समर्थ रामदास स्वामी मठ टाकळी येथे शुक्रवारी (दि. १९) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.१९ वाजता जन्मोत्सव, दुपारी ११.४५ पर्यंत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी महाआरती, भंडारा, भजन सेवा व भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एस. टी. पांडे, विश्वस्त सुधीर शिरवाडकर आदींनी केले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक