नाशिक : मायको एम्प्लॉईज फोरमच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मानव सेवा केंद्र, सिडको येथे झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यातआली.यावेळी पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून बॉश कंपनीच्या व्यवस्थापक तेजस मोगरे व अश्विनी दशपुते यांनी काम पाहिले. विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन महिलांना रोख पारितोषिक देण्यात आले. सहभागी सर्व महिलांना सुहाना मसालेतर्फे सरप्राईज गिफ्ट देण्यात आले. याच कार्यक्रमात प्रात्यक्षिकासह जया जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच चायनिज खाद्यपदार्थ कार्यशाळेत अश्विनी दशपुते यांनी विविध प्रकारच्या चायनिज रेसिपी शिकविल्या. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमा कुºहे यांनी केले. कार्यक्रमास संजय कुºहे, वासुदेव उगले, अविनाश दशपुते, भीमराव कोते, किरण पाटील, अलका कुलकर्णी, स्वाती जोशी, अनिता पाटील, सुशीला पिंप्रीकर यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
मायको एम्प्लॉईज फोरमतर्फे विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:23 PM
मायको एम्प्लॉईज फोरमच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मानव सेवा केंद्र, सिडको येथे झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
ठळक मुद्देमानव सेवा केंद्र : विजेत्यांना पारितोषिक