त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानमोठ्या झाडांना तेथीलच लहान मोठ्या दगडांच्या सहाय्याने पार करणे, ओटे तयार करणे, पावसाचे पाणी वाहुन जाऊ नये म्हणुन झाडांना ओटे तयार करण्याचे काम येथील पर्यावरणावादी सेवाभावी आयपीएल गु्रुपतर्फे श्रमदानातून करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार व ब्रह्मगिरी हे दोन सुप्रसिद्ध पहाड असून गंगाद्वार येथे वरपर्यंत जाण्याकरता ७५० पायºया आहेत तर ब्रम्हगिरीवर जाण्यासाठी अर्धा रस्ता कच्चा होता तर भातखळ्यापासुन पुढे ५५० पायºया आहेत. आता संपुर्ण रस्त्यावर खालपासुन वर जिन्यापर्यंत सिंहस्थात पायºया तयार केल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुर्वी दाट जंगल होते. मात्र गेल्या दहा ते १५ वर्षांपासून कमी पावसामुळे वृक्षराजी कमी झाली आहे. जंगल राहिलेच नाही. पाऊस कमी झाला आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडुन प्रदूषण वाढत आहे. यासाठी आयपीएल या सेवाभावी ग्रुपच्या सदस्यांनी एक मोठे काम श्रमदानातुन हाती घेतले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करणे, या झाडांना पाणी राहण्यासाठी झाडांभोवती आळे तयार करु न पाणी भरणे, झाडांभोवती तेथीलच दगडांचा पार (ओटा) तयार करणे, मोठ्या झाडांना चुना गेरु लावणे इत्यादी कामे थेट श्रमदानातून सुरु आहेत. थोडक्यात सांगायचे तर झाडांभोवती पाणी अडविणे व पाणी जिरविणे. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहुन न जाता ते अडविणे हा प्रमुख उद्देश्य या मागे असल्याचे ग्रुपच्या ललित लोहगावकर , अॅड.पराग दीक्षित, सचिन कदम यांनी सांगितले.----------टाकाऊपासून टिकाऊ...विशेष म्हणजे याच मंडळाने टाकाऊ पासुन टिकाऊ ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. ती संकल्पना म्हणजे मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्यांद्वार तीन ते चार माणसे बसतील अशी छोटी होडी तयार केली होती. गेल्या दोन वर्षांपासुन गावातील सार्वजानिक गणपती घरातील गणपती विसिर्जत करण्याचे काम करीत आहे. असे सामाजिक काम आयपीएल गु्रपतर्फे सुरू आहे. याशिवाय गावातील हरित ब्रह्मगिरी ग्रुप युथ फाउंडेशन हे ग्रुपदेखील पर्यावरणाच्या दृष्टीने सतत कार्यरत असतात. गोदामाता पूर्वीप्रमाणेच खळाळत वाहिली पाहिजे तिला पुर्ववैभव प्राप्त व्हावे यासाठी गावातील अनेक लोक या सेवाभावी कार्यात सहभागी आहेत. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह , गोदावरी गटारीकरण मोहीमेचे राजेश पंडीत आदी कायमच सहभागी होत असतात. या सर्वांच्या प्रयत्नासह त्र्यंबकेश्वर वनविभाग देखील हिरीरीने सहभागी होउन पर्यावरण साधण्यासाठी सहभागी होत आहेत.
त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर श्रमदानातून विविध कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:39 PM