नाशिकरोड : येथीलप्रभाग २२ मध्ये मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पाहणी दौरा करून विविध कामे मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या. प्रभाग २२च्या नगरसेवक सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, सरोज आहिरे, नगरसेवक केशव पोरजे, प्रभाग २१ चे नगरसेवक सूर्यकांत लवटे, उपायुक्त रोहिदास दोरूळकर, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, बांधकाम उपअभियंता पालवे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, उत्तम कोठुळे आदींनी प्रभाग २२ देवळालीगाव येथील महात्मा गांधी पुतळा, यशवंत मंडई, सोमवार आठवडे बाजार मैदान, कुस्ती मैदान, वालदेवी नदी परिसर तसेच विहितगाव येथील जॉगिंग ट्रॅक, क्रीडांगण, विहितगाव वडनेरदुमाला रस्ता या परिसराची पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी महात्मा गांधी पुतळ्याचे सुशोभीकरण करणे, यशवंत मंडई बीओटी तत्त्वावर बांधण्याबाबत सूचना केल्या. तसेच सोमवार आठवडे बाजाराला संरक्षक भिंत, वालदेवी नदीवर ठिकठिकाणी घाट बांधणे, वालदेवी नदीत मिसळणारे गटारीचे पाणी त्वरित बंद करणे, विहितगाव ते देवळालीगाव वालदेवी नदीवर फुटवेअर पूल बांधणे, विहितगाव जॉगिंग पार्कला संरक्षक भिंत व क्रीडांगण सुव्यवस्थित बनविणे, रस्ता रुंदीकरण करणे आदी कामांसाठी संबंधित अधिकारी सूचना करून कामाच्या निविदा काढण्याच्या सूचना कृष्ण यांनी केल्या.
विविध कामे मार्गी लावण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:36 AM