लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थान तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत ८० दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.कमीअधिक प्रमाणात सर्वच भागात पाऊस पडत आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मागील आठवड्यात पावसाचा जोर ओसरला होता; परंतु पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने शेतशिवार हिरवेगार झाले आहे. काही भागात शेतात पाणी साचल्याने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यावरच लाभक्षेत्रातील शेतीचे गणित अवलंबून असते. परंतु पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.दरम्यान, धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत़ पाऊस कधी पडेल आणि धरण कधी भरेल यासाठी शेतकरी परिसरातील महादेव मंदिरामध्ये साकडे घालत आहेत़ दोन महिन्यापासून प्रतीक्षमागील वर्षी भोजापूर धरण २ आँगस्ट रोजी पूर्ण भरले होते. यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे, मात्र धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत वाढला नाही. गतवर्षी भोजापूर धरणात २७ जुलैपासून पाण्याची पातळी वाढणास सुरूवात झाली होती. मात्र यंदा दोन महिन्यापासून धरण क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा आहे़ धरण साठा वाढला नाही तर परिसरातल लाभधारक शेतकºयांवर पिके सोडून देण्याची वेळ येणार आहे़ आधीच कोरोनाच्या संकटांचा सामना करताना नाकीनव आलेले असतांना पुन्हा नव्हे संकट उभे राहू नाही याची अपेक्षा शेतकरी करीत आहे़
पाणलोट क्षेत्रावर वरूणराजा रूसलेलाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:09 PM
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थान तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत ८० दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
ठळक मुद्देधरणातील साठा आटला । गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी