देवळा : देवळा तालुक्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या झळा देवळा शहरातील नागरीकांनाही बसत असून महीला वर्ग त्रस्त झाला आहे. यामुळे पुर्वी धोंडया धोंडया पाणी दे म्हणत वरूणराजाला साकडे घालण्याची ग्रामीण भागातील प्रथा आता शहरात सुरू झाली असून उपनगरात राहणाऱ्या नोकरदार महिलांनी एकत्र येत शहरात फिरत वरूणराजाला साकडे घातले.शहरातील कळवण रस्त्यावरील समर्थनगर, सप्तश्रृंगी नगर आदी उपनगरातील महिलांनी गत तीन दिवसांपासून धोंडया धोंडया पाणी दे, साळमाळ पिकू दे असे म्हणत वरूण राजाला साकडे घालण्याचा उपक्र म सुरू केला आहे. यावेळी धोंडया झालेल्या ज्येष्ठ महिलेला पानाफुलांनी सजवून तिची मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी जाऊन महिलांनी पूजन केले. यावेळी नागरीक देत असलेल्या दानातून वृक्षारोपण करण्याचा महिलांचा मानस आहे. देवळा शहरासाठी गिरणा नदीपात्रातून सामुदायिक पाणीपुरवठा योजना सुरू आहे. हया पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या देवळा, सरस्वतीवाडी, माळवाडी, फुले माळवाडी, विजयनगर, खुंटेवाडी, श्रीरामपूर, खालप या गावांना पाणीपुरवठा केला जातो. गिरणा नदीला पाणी असेल तरच योजना सुरू असते. परंतु सध्या चणकापूर धरण अद्याप कोरडेच असल्यामुळे गिरणा नदी कोरडीच आहे. यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प आहे.
देवळ्यात महिलांचे वरुणराजाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 6:05 PM
धोंड्या धोंड्या पाणी दे : शहरातही प्रथा सुरू
ठळक मुद्देउपनगरात राहणाऱ्या नोकरदार महिलांनी एकत्र येत शहरात फिरत वरूणराजाला साकडे घातले.