शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

वसंत गिते, सुनील बागुल यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 1:53 AM

माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत शुक्रवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले.

ठळक मुद्देपक्षांतर : मुंबईत बांधले शिवबंधन; अनेक कार्यकर्त्यांनीही केला प्रवेश

नाशिक : माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत शुक्रवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. गेल्या दोन दिवसांपासून भाजपाचे अनेक पदाधिकारी व महापालिकेतील नगरसेवकांनी आपल्याशी संपर्क केला असून, लवकरच नाशिक शहराचे चित्र बदललेले दिसेल, असा गौप्यस्फोट राऊत यांनी यावेळी केला.   हॉटेल एक्स्प्रेस इन येथे सकाळी हा प्रवेश सोहळा झाला. खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत वसंत गिते, सुनील बागुल, शोभा मगर व नामको बँकेचे संचालक प्रकाश दायमा यांच्या प्रवेशाची घोषणा केली. यावेळी बोलताना राऊत यांनी, गिते, बागुल यांच्या सेना प्रवेशाविषयी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. नाशिक हा सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे या दोघांच्या प्रवेशाने पक्षाला आणखी बळकटी येईल, त्यांच्यावर लवकरच नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले. गेल्या दोन दिवसांच्या आपल्या दौऱ्यात भाजपचे अनेक लोक भेटले, त्यात महापालिकेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. आता प्रवाह बदलत चालला असून, आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महापौर शिवसेनेचाच होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, वसंत गिते, दत्ता गायकवाड,   डी.जी. सूर्यवंशी, सत्यभामा गाडेकर, शरद देवरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणPoliticsराजकारणVasant Giteवसंत गीतेUddhav Thackerayउद्धव ठाकरे