नाशिक : ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्यामुळेच व्यावसायिक रंगभूमी यशस्वी झाली आहे. खऱ्या कलावंताचे नाटकातील काम प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते. प्रेक्षक मनात घरी घेऊन जातो ते खरे नाटक असते, असे प्रतिपादन अभिनेता सुबोध भावे यांनी केले.सावानाच्या वतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित वसंत कानेटकर स्मृती रंगसोहळ्यात ‘कलाकारांसमवेत संवाद’ या कार्यक्रमात भावे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हेमंत टकले उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांनी भावे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका यापैकी कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडते, अशी विचारणा केली असता भावे म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रातील प्रेक्षक वेगळा असतो. मला नाटकात काम करणे सोपे वाटते, तर चित्रपट काम करणे अवघड वाटते. कोणत्याही नटावर भूमिकेचा शिक्का बसायला नको. प्रेक्षकांना आवडत्या भूमिका तर मी करतोच, परंतु मला आवडणाºया नकारात्मक भूमिकादेखील स्वीकारतो त्यामुळेच टीव्ही मालिकेत नकारात्मक भूमिका करत आहे, असेही भावे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात चांगली चित्रपटगृहे नाहीत खंत त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, धर्माजी बोडके, किशोर पाठक, शंकर बोराडे, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते.
वसंत कानेटकर स्मृती रंग सोहळा रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:47 AM