नाशिक : वसंत व्याख्यानमाला या संस्थेला अनुदान देण्याच्या विषयावरून श्रीकांत बेणी यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले असतानाच माजी कार्यवाह रमेश जुन्नरे यांनी संस्थेतील गैरव्यवहारामुळे या आधीच्या दोन आयुक्तांनी नाकारलेले अनुदान विद्यमान आयुक्तांनीही देऊ नये, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.वसंत व्याख्यानमालेस मंजूर तीन लाख रुपयांचे अनुदान मिळत नसल्याने अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी मनपा मुख्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले असून, ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि.९) कायम होते. दरम्यान, माजी कार्यवाह जुन्नरे यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले असून, या संस्थेत ५० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल असून, त्यावर निकाल झालेला नाही. त्याचप्रमाणे व्याख्यानमालेला मनपाने दिलेल्या भूखंडाचा संस्थेला कोणत्याही प्रकारचा उपयोग झाला नसून, व्याख्यानमाला केवळ महिनाभर आणि तीही गंगाघाटावर होत असल्याने या जागेचा उपयोग नाही तथापि, ही जागा भाड्याने दिली जात असल्याचा आरोप जुन्नरे यांनी केला आहे.
वसंत व्याख्यानमालेचा तिढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:20 AM