एकलहरे : एकलहरे वसाहतीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी नवीन्यपूर्ण पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. येथील शिक्षिका वडाच्या फांद्या न तोडता वटपौर्णिमेनिमित्त सगळ्यांनी एकेक वडाचे झाड लावून विधिवत पूजन केले. यावेळी डोके, रणशूर, बर्वे व काटे या सगळ्यांनी मिळून वडाच्या झाडाचे शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करून, नवीन आदर्श मांडण्याचा प्रयत्न केला.
-----------------
मातोरी : वटपौर्णिमेनिमित्त मातोरी गावातील विशाल वटवृक्षाची महिलांनी पूजा करून सौभाग्याला दीर्घायुष्याची प्रार्थना केली. सकाळपासूनच सौभाग्यवतींनी वटपौर्णिमेची तयारी सुरू केली होती. गावात असलेल्या विशाल वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली आणि आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना केली.
------------------
इंदिरानगर : भाजपप्रणीत युनिक ग्रुपच्या वतीने वटसावित्री पौर्णिमेनिमित्त परिसरातील वटवृक्षाची सुवासिनींनी पूजा करून नव्याने बांधण्यात आलेल्या ओट्याचे लोकार्पण केले. इंदिरानगर परिसरातील संगम कॉलनी, विशाखा कॉलनी व पाटील गार्डन परिसरातील महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी गैरसोय होत असल्याने औटा बांधून देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अनिकेत सोनवणे यांनी स्वखर्चाने तीन ठिकाणी वडाच्या वृक्षाला औटे बांधून दिले. त्या औट्यांचे लोकार्पण वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वर्गाकडून पूजा करून करण्यात आले.
------------
इंदिरानगर : कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नियमांचे पालन करून वटपौर्णिमा महिलांनी उत्साहात साजरी केली. गतवर्षी कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाच्या वतीने कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे वटपौर्णिमा महिलांनी घरातच साध्या पद्धतीने साजरी केली होती. परंतु, यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने निर्बंध उठविल्यामुळे सकाळपासून ते दुपारपर्यंत अरुणोदय सोसायटीतील श्री नागेश्वर महादेव मंदिर, महारुद्र हनुमान मंदिराच्या आवारात असलेल्या, राणेनगर देवी मंदिरालगत व आदर्श कॉलनीसह परिसरातील वडाच्या वृक्षाची सुवासिनींनी सुरक्षित अंतर ठेवून मास्क वापर करून पूजा केली.
----------------
सिडको : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा सिडको विभागाच्या वतीने वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाचे झाड व वटपौर्णिमा पुस्तिकाचे वाटप आमदार सीमा हिरे व युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. वैभव महाले यांच्या हस्ते करण्यात आले.
सिडकोतील शुभम पार्क, बंदावणे नगर, ओम कॅालनी, जयहिंद काॅलनी परिसरात वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वडाचे झाड व वटपौर्णिमा पुस्तिका वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, नगरसेविका अलका आहिरे, अशोक पवार, आदित्य दोंदे, सुशील नाईक, आदी उपस्थित होते.
(फोटो २४ भाजप) - भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा सिडको विभागाच्या वतीने वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाचे झाड व वटपौर्णिमा पुस्तिकेचे वाटप करताना आमदार सीमा हिरे, डॉ. वैभव महाले समवेत लक्ष्मण सावजी, अविनाश पाटील, अलका आहिरे, अशोक पवार, आदित्य दोंदे, सुशील नाईक, आदी.
-----------------------