नाशिक: पतीसह कुटुंबातील सर्वांना दिर्घायुष्य आणि आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करीत पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला .यंदा कोरोनाचे सावट असल्याने महिलांनी तोंडाला मास्क लावून फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत घराच्या नजिक असलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन या व्रताचे पालन केले.पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस 'वटपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. यात विवाहित स्त्रिया पतीला आणि कुटुंबाला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्याने वटपौर्णिमा साजरी करण्या बाबत संभ्रम निर्माण झाला होता .मात्र पंचांग कत्र्यांनी चंद्रग्रहणात देखील वटपौर्णिमा साजरी करता येईल ,असे सांगितल्याने हा संभ्रम दूर झाला .आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत महिलांनी वटपौर्णिमेचा सण साजरा केला.महिलांनी पैठणी, नऊवार नेसून व सौभाग्य अलंकार लेवून घरानजीकच असलेल्या वडाचे पूजन केले .काही ठिकाणी पुरोहीत व ब्रह्मवृदांनी पोथी वाचन केले. तर काही ठिकाणी स्वत: सुहासिनींनी पोथी वाचन करित या व्रताचे पालन केले. वडाच्या झाडाला सुताचा दोरा गुंडाळत सुवासिनींनी गहू, आंबा आदि पदार्थांनी एकमेकींची ओटी भरून हळदीकुंकू केले. काही महिलांनी घरच्या घरीच वडाची फांदी आणून पूजाविधी केले. सकाळी ८ वाजेपासून दुपारी १.३० वाजेपर्यंत वटपूजनाचा मुहूर्त होता. काही कॉलनी आणि नवसाहतीत रस्त्यालगतच वडाची नवीन झाडे लावलेली असून अपार्टमेंट समोर देखील खास वडाची झाडे लावलेली दिसतात. विशेषत: इंदिरानगर ,सिडको ,सातपूर, पंचवटी, नाशिकरोड आदी भागांमध्ये महिलांनी आपल्या घरालगत असलेल्या चौकात तसेच उद्यानातील वडाच्या झाडाची पूजन करीत हा सण साजरा केला. विशेष म्हणजे यंदा हा सण जागतिक पर्यावरण दिनीच आल्याने ा अनेक महिलांनी आपल्या कुटुंबासह वृक्षारोपण करीत या सणाचा आनंद द्विगुणित केला.'घराबाहेर पडू नये असे पोलिसांचे आवाहन' वटपौर्णिमेच्या सणासाठी महिलांनी एकत्र येत घराबाहेर पडू नये, शासनाच्या नियमांचे पालन करीत घरातच वटपौर्णिमा साजरी करावी, असे आवाहन पोलिसांकडून ध्वनिक्षेपका द्वारे करण्यात येत होते . काही महिलांनी या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच वटपौर्णिमा साजरी केली. तसेच कोरोनाचे संकट टळू दे, अशी प्रार्थना देखील केली.
फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 6:41 PM
नाशिक : पतीसह कुटुंबातील सर्वांना दिर्घायुष्य आणि आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करीत पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला .यंदा कोरोनाचे सावट असल्याने महिलांनी तोंडाला मास्क लावून फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत घराच्या नजिक असलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन या व्रताचे पालन केले.
ठळक मुद्देसुवासिनींनी तोंडाला बांधले मास्क घरच्याघरी केले वटपूजन