वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील वटार येथे किशोरवयीन मुलींसाठी एकात्मिक महिला आणि बालविकास प्रकल्प विभागाकडून सबला शिबिराचे उद्घाटन तालुका बालविकास अधिकारी एस. टी. दुधाळकर यांच्या हस्ते वटार येथील अंगणवाडी केंद्रात पार पडले. यावेळी सरपंच प्रशांत बागुल, माजी सरपंच रामदास खैरनार, उपसरपंच पोपट खैरनार, अनिल पाटील, पर्यवेक्षक संगीता घोलप, पर्यवेक्षक पौर्णिमा खैरनार, हरिभाऊ खैरनार, विठ्ठल सोनवणे, अशोक बागुल, पंढरीनाथ खैरनार आदि प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व जाती-धर्माच्या गोरगरीब, सर्वसाधारण कुटुंबातील मुलींना पाच दिवसांत अद्ययावत सदृढ जीवनशैली आणि जगण्याची हिंमत वाढेल, आयुष्यभर सदृढ आरोग्य जगण्याची शिदोरी या शिबिरातून किशोरवयीन मुलींना मिळेल. ग्रामीण भागातील युवतींना स्वयंसिद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांची खरी गरज आहे, असे मत एस. टी. दुधाळकर यांनी केले. शिबिराचे आयोजन वटार बीटच्या मुख्य सेवक कुसूम खैरनार व सुशीला अहिरे यांनी केले. या शिबिरासाठी परिसरातील अंगणवाडी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वटार येथील कुसूम खैरनार, सुशीला अहिरे, ललिता सोनवणे, प्रमिला गांगुर्डे, सुनीत अहिरे, वीरगावच्या भिकुबाई दुसाने, संगीता गांगुर्डे, प्रमिला गांगुर्डे, तारा देवरे, मीना अहिरे, यशोदा पवार, हिरूबाई गांगुर्डे उपस्थित होते. (वार्ताहर)
वटारला सबला प्रशिक्षणाचा शुभारंभ
By admin | Published: January 21, 2017 11:22 PM