नाशिक : गंगापूररोडवरील वाहतूकीला अडथळा ठरणारे वृक्ष महापालिकेने हटविली. यामुळे रस्ता मोकळा झाला असून पालिकेने रस्त्याचे डांबरीकरणही केल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, रस्त्यात अडथळा ठरणारे महावितरणचे काही खांब रस्त्यात ‘जैसे-थे’ होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळत होते. याबबतचे छायाचित्र ‘लोकमत’मधून प्रसिध्द झाल्यानंतर महावितरण कंपनीला जाग आली असून सदर खांब रस्त्यामधून हटविण्यात आले आहे. यामुळे रस्त्यातील अडथळा दूर झाला आहे. याबाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सदरचे खांब मोठ्या संख्येने रस्त्यात होते. या खांबांना रेडियम किंवा पांढरे पट्टे देखील नसल्यामुळे रात्रीच्या वेळी खांब रस्त्यात असल्याचा कुठलाही अंदाज वाहनचालकांना बांधता येत नव्हता. याबाबत अनेकदा नागरिकांनी तक्रारी करूनदेखील विद्यूत खांब स्थलांतरीत केले जात नव्हते. यामुळे धोका कायम होता. ‘लोकमत’मधून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष छायाचित्र प्रसिध्द करून वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर तत्काळ गंगापूररोडवरील सदर खांबांचा अडथळा संबंधित प्रशासनाने दूर केला.
असल्याने अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. संबंधित यंत्रणेची मात्र याकडे डोळेझाक होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गंगापूररोड कृती समितीनेदेखील या रस्त्यावरील असे अडथळे हटविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे बोलले जात आहे.