शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

वीर सावरकरांना भारतरत्न मिळण्याच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 1:11 AM

प्रखर हिंदुत्वादी आणि जहाल क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कष्टाचे मोल जाणणाऱ्या विचारांचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या घोषणेमुळे येत्या पाच वर्षांत तरी त्यांना भारतरत्न हा सर्वाेच्च नागरी सन्मान मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

स्वा. सावरकर  जयंती विशेषनाशिक : प्रखर हिंदुत्वादी आणि जहाल क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कष्टाचे मोल जाणणाऱ्या विचारांचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या घोषणेमुळे येत्या पाच वर्षांत तरी त्यांना भारतरत्न हा सर्वाेच्च नागरी सन्मान मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.नाश्कि जिल्ह्यातील भगूरचे सुपुत्र असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना हटविण्यासाठी सशस्त्र चळवळीचा पुरस्कार केला. अनेक क्रांतिकारांची ते प्रेरणा होते किंबहुना त्यांनी अनेक क्रांतिकारक तयार केले. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाºया सावरकरांना ब्रिटिशांनी अटक केल्यानंतर काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली, परंतु त्याचे रूपांतर भारतीय जनतेच्या असंतोषात होऊ नये यासाठी त्यांना अंदमानच्या तुरुंगात ठेवले. तेथून मुक्ततेनंतर त्यांनी जातीअंताची चळवळ चालवली. परंतु भाषानिष्णात, कवी, साहित्यिक असे अनेक पैलू त्यांच्या ठायी होते. त्यामुळे त्यांना भारत्नरत्न पुरस्कार द्यावा, अशी सावरकरप्रेमींची इच्छा असून, यापूर्वी तशा मोहिमादेखील झाल्या आहेत, परंतु हाती काहीच पडले नाही. तथापि, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये हा विषय प्रामुख्याने हाताळला. श्रद्धा लॉन्समध्ये युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राऊत यांनी देशात पुन्हा रालोआची सत्ता आली तर त्यांना भारतरत्न मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दणदणीत बहुमत मिळाले असून, आता सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेषत: गेल्या चार वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने अनेक निर्णय आपल्यामुळेच घेतल्याचे दावे शिवसेनेने केले होते. त्यापार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडूच अपेक्षा वाढल्या आहेत.शिवसेनेने चालविली होती चळवळकाही वर्षांपूर्वी शिवसेनेचे शहर उपमहानगर प्रमुख (कै.) अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी यांनी सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून एक लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम सुरू केली होती. मात्र त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर ही मोहीम बंद पडली.२०१४ मध्ये देशात राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी अभिनव भारत संस्थेच्या वतीने ठराव करून केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र पाच वर्षांत काहीच झाले नाही. आत्ता याच सरकारला पुन्हा पाच वर्षे सत्ता मिळाली आहे यामुळे याच पाच वर्षांत तरी सावरकरांना हा सर्वाेच्च बहुमान मिळेल, अशी अपेक्षा आहे.- सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, अभिनव भारत संस्था, नाशिक

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक