नायगाव - सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथिल जवान अमोल रामनाथ झाडे ( २७ )यांना सिक्कीममध्ये आजाराने वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या निधनामुळे चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे. सिक्कीम येथे अमोल झाडे यांचे गुरूवार ( दि.१३ ) निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी चिंचोली येथे दुपारी त्यांच्या मराठा बटालियन मधील सहका-यांकडुन कळाली. त्यांचे पार्थिव सिक्कीम येथुन विमानाने मुंबई येथे आणण्यात आले. तेथून वाहनाने गावी आणण्यात आले. येथील व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात कोविडचे सर्व नियम पाळून अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलातील अधिकारी, तहसिलदार राहुल कोताडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे,माजी सरपंच संजय सानप,पोलिस पाटील मोहन सांगळे आदीसह मोजके ग्रामस्थ उपस्थित होते.---------------------१८ व्या वर्षीच सैन्यदलात दाखलअमोल झाडे हे २००८ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचोली आणि पुढील शिक्षण सिन्नरमध्ये झाले. झाडे यांना त्यांच्या आई व कंपनीत असलेल्या भावाने मोठ्या मेहनतीने शिकवले होते. आपल्या १३ वर्षाच्या कालावधीत त्यांनी जम्मु,काश्मीर,पठाणकोट व सिक्कीम ( आसाम ) आदी ठिकाणी सैन्य दलात सेवा केली. दोन वर्षानी त्यांची सैन्य दलातील सेवा संपणार होती.
चिंचोलीच्या जवानाला सिक्कीममध्ये वीरगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 2:21 PM