शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:04 PM

सायखेडा : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभी पिके करपली असून, शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतमाल अल्पप्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

ठळक मुद्देनिफाड परिसर : पाणीटंचाईमुळे पिके करपलीआवक घटल्याने

सायखेडा : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभी पिके करपली असून, शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतमाल अल्पप्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढते बाजारभाव शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले तरी सर्वसामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे आहेत. आठवडे बाजार गरिबाच्या खिशाला महाग झाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.वर्षभर शेतमाल कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारे भांडवलदेखील वसूल झाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पिकविलेला माल विक्रीसाठी नेला नाही.डिसेंबर महिन्यापासून विहिरींनी तळ गाठला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना शेतीसाठी पाणी कुठून येणार? अशा परिस्थितीत उभी पिके सुकूनगेली. दोन-तीन महिन्यांपूर्वीचा परिणाम आज दिसू लागला आहे. आठवडे बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. भाजीपाल्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. बाजारात विक्र ीसाठी येणारी आवक घटल्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. वर्षभर न मिळालेला भाव मिळत आहे, मोजक्या शेतकºयांना फायदा होत असला तरी सामान्य जनतेला आणि मजूरवर्गाला हे बाजारभाव न परवडणारे आहेत.दुष्काळाच्या झळा सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. उन्हाळ्यात हाताला काम मिळत नाही, मजुरी नाही, शेतकºयांकडे पैसे नाही. अशा परिस्थितीत कुटुंब चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.आठवडे बाजारात गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे दर आज खिशाला महाग होत आहे. कोणताही भाजीपाला किमान ५० रुपये किलो दराच्या पुढे खरेदी करावा लागत आहे. उन्हाळा असल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे कुटुंब खर्च करणे अवघड झाले आहे.- रवींद्र शिंदे, भेंडाळीशेतकºयांकडे शेतमाल कमी झाला की बाजारभाव वाढतात, शेतमालाचे भाव स्थिर राहिले पाहिजे, शेतकºयांना कायम भाव मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल. केवळ मालाचा तुडवडा आल्याने भावात तेजी आली नाही तर वर्षभर कवडीमोल भावात विक्र ी करावी लागली.- कैलास डेर्ले, शिंगवेआजचे बाजारभावमेथी २० रु . जुडीकोबी ३० रु . गड्डाफ्लॉवर ७० रु . किलोमिरची ८० रु . किलोदोडका ८० रु . किलोकारले ६० रु . किलोशेपू २० रु . जुडीटमाटे ४० रु . किलोगिलके ६० रु . किलो