सायखेडा : पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने वाढत्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक आणि मजुरी यासाठी ३०० रुपये प्रति क्विंटलसाठी खर्च केलेले गाजर२०० रु. प्रतिक्विंटल गेल्याने शेतकºयाला खिशातून खर्च करावा लागत आहे.फेब्रुवारी महिन्यात विहिरी तळ गाठतात, पाण्याची समस्या निर्माण होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. अशा वेळी आपला उदरनिर्वाह चालावा, कुटुंबाचे गुजराण चालावे, मुलांचा खर्च कुठूनतरी उपलब्ध करावा यासाठी अनेक शेतकरी पाच ते दहा गुंठे भाजीपाला शेतात करत असतात. भरउन्हात बाजारभाव मिळून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा असते. मुबलक उत्पादन मिळाले नाही तरी किमान कुटुंबाचा खर्च चालवा, असे शेतकºयांना वाटत असते.आज पारंपरिक पद्धतीने शेती न करता अनेक तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमाल पिकवतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. अशा भावात भांडवलदेखील वसूल होत नसल्याने भर उन्हाळ्यात भाजीपाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे.खर्चाचा नाही मेळ अन् खिशाला बसते झळ...शेतमाल आज कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पिकासाठी केलेला खर्च वसूल होत नाही. अनेक शेतकºयांनी तर तोडणीसाठी आलेला शेतमाल शेतात सोडून दिला आहे. शिंगवे येथील शेतकºयांचे नाशिक बाजार समितीत गाजर २ प्रतिकिलो दराने विक्र ी झाले. गाजर शेतातून काढून बाजार समितीच्या आवारात आणण्यासाठी क्विंटलसाठी ३०० रु. खर्च येतो शेतकºयांना १०० रु. खिशातून द्यावे लागले तर मिरची १० रु . प्रतिकिलो विक्र ी झाल्याने खर्च वसूल होत नाही, असा कोणताच शेतमाल नाही की ज्याला चांगला भाव मिळत आहे सर्व भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे.शेतात नेमकं काय पिकवावं याचा सल्ला सरकारने द्यावा. वर्षभरात जे जे पीक केले ते कवडीमोल भावात विकावे लागले. शेतीचे उत्पन्न दुप्पट करणे दूरच राहिले. शेतकºयांना कर्ज बाजारी करून ठेवले आहे, सरकारची अनास्था, नियोजनाचा अभाव यामुळे ही वेळ आली आहे.- गोरख खालकर,माजी सरपंच, भेंडाळीउन्हाचे ४० डिग्री तपमान आणि पाण्याची टंचाई अशा परिस्थितीत पिकविलेला शेतमाल आज कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने खर्चदेखील वसूल होत नाही. तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वसूल होत नाही तर भांडवल दूरच आहे. आज शेतीवर उपजीविका होऊ शकत नाही तर शेतकºयांची प्रगती दूर आहे.- दीपक डेर्ले, शेतकरी शिंगवे