शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

दिवसा भाजीबाजार, रात्री मद्यबार

By admin | Published: December 16, 2015 12:19 AM

नागरिक त्रस्त : उपेंद्रनगर भाजी मार्केट हटविण्याबाबत नगरसेवक आक्रमक

सिडको : येथील माणिकनगर, उपेंद्रनगर भागातील अनधिकृत भाजीबाजारातील घाण, कचऱ्यामुळे व रात्रीच्या वेळी याच ठिकाणी टवाळखोरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच याच भाजीबाजारालगत मुख्य रस्त्यावरच भाजीपाला व्यावसायिक व्यवसाय करीत असल्याने परिसरातील नागरिकांना ये-जा करतानाही त्रास होत असल्यामुळे सदरचा भाजीबाजार हटविण्यात यावा, याबाबत परिसरातील नागरिकांची नुकतीच बैठक झाली असून, याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे नगरसेवक माणिक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सिडकोतील माणिकनगर, उपेंद्रनगर व महाजननगर भागातील नागरिकांच्या प्रवेशद्वारावरच मनपाच्या भूखंडावर अनधिकृत भाजीबाजार भरत आहे. या भाजीबाजारामुळे येथील रहिवाशांची सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक होत असल्याचे नगरसेवक माणिक सोनवणे यांनी सांगितले. या भाजीबाजारातील काही व्यावसायिक हे मुख्य रस्त्यावरच आपला व्यवसाय करीत असल्याने व भाजीपाला घेण्यासाठी येणारे नागरिकही त्यांची वाहने रस्त्यातच लावत असल्याने परिसरातील नागरिकांना या ठिकाणाहून ये-जा करणे कठीण होत आहे. यातच भाजीबाजारातील उरलेला व खराब भाजीपाला हे व्यावसायिक तेथेच टाकून देत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा पडलेला असतो. यामुळे पारिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाच्या याच भूखंडावरून महावितरण कंपनीची उच्च दाबाची तार गेलेली आहे. यातच येथील काही तथाकथित भाजी व्यावसायिकांच्या दबंगगिरीलाही येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. भाजीबाजार हटविण्यात यावा यासाठी परिसरातील नागरिक एकवटले असून, याबाबत झालेल्या बैठकीप्रसंगी प्रभाकर सोनवने, प्रेमनाथ ब्राह्मणकर, हरिश्चंद्र जगताप, रामनाथ मालुंजकर, दत्तू अहिरे, रवींद्र मोरे, धनंजय बागुल, चंद्रकांत अमृतकर, केवळ खैरणार आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)