शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
2
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
3
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
4
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
5
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
6
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
7
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
8
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
9
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व
10
'बिग बॉस' मराठीचा महाअंतिम सोहळा आणि हिंदीचा ग्रँड प्रीमियर एकाच दिवशी, जाणून घ्या तारीख
11
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
12
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
13
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
14
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
15
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
16
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
17
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
18
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
19
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
20
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं

दुर्लक्षामुळे फोफावला भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:22 AM

सातपूर : दिसली जागा की थाटला भाजीबाजार या पद्धतीप्रमाणे शहरात कुठेही भरणारा भाजीबाजार हे आता सर्रास समीकरण ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : दिसली जागा की थाटला भाजीबाजार या पद्धतीप्रमाणे शहरात कुठेही भरणारा भाजीबाजार हे आता सर्रास समीकरण ठरले आहे. स्थानिक नागरिकांची गरज आणि बेरोजगारी यामुळे त्याकडे सामाजिक प्रश्न म्हणून बघितले जात असले तरी भाजीबाजार डोकेदुखी ठरली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सातपूर येथील भाजी मंडईचा प्रश्न असाच निर्माण झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज मंडई बाहेरील भाजी विक्र ेत्यांचे अतिक्र मण हटविण्यास मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सपशेल अपयश आले आहे.  सुमारे तीस वर्षांपूर्वी सातपूर गावात महानगरपालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंडईची उभारणी करण्यात आली. जवळपास ६० गाळे आणि पहिल्या मजल्यावर तेवढेच गाळे बांधण्यात आलेले आहेत. मंडईत भाजी विक्रेत्यांसाठी सोय करण्यात आली आहे. कालांतराने मंडईबाहेर देखील काही भाजी विक्र ेत्यांनी व्यवसाय सुरू केला. त्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊ लागला आणि वादाला सुरु वात झाली आहे. ग्रामस्थांनी मंडई बाहेरील अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्याची जोरदार मागणी सुरू केली. मनपा प्रशासनाने सुरु वातीला छोटी-मोठी कारवाई केली. दबाव वाढल्याने तीन वर्षांपूर्वी पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबविण्यात आली होती. बॅरिकेडिंग लावण्यात आले होते. काही दिवस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्त हटल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने भाजी विक्रेत्यांविरोधात ज्या ज्या वेळी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळी भाजी विक्रेतेच भारी पडलेले आहेत आणि प्रशासनाला हतबल व्हावे लागले आहे. त्यामुळे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रामस्थांचा वाढत दबाव आणि  आक्रमक भाजी विक्र ेते यात मनपा प्रशासन दुबळे पडले आहे. तर लोकप्रतिनिधींनी देखील बघ्याची भूमिका घेतली आहे. हा वाद अजून किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही.