(फोटो २२ भाजी)
पेठरोडला पवार बाजार समितीबाहेर मुख्य वाहतूक रस्त्यावर सायंकाळी भाजीबाजार भरत असल्याने नागरिकांना वाहने नेणे सोडाच, परंतु पायी चालत जाणे अवघड होत असल्याचे चित्र दिसून येते.
शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांनी बेशिस्तपणाचा कळस गाठला असला, तरी याकडे मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने
आगामी कालावधीत पंचवटी कोरोना हॉटस्पॉट बनण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पेठरोडला संध्याकाळी किरकोळ भाजीविक्रेत्यांसह शेतकरी चारचाकीतून शेतमालाची विक्री करतात. पेठरोड आरटीओ कार्यालयाबाहेर रस्त्यावर दैनंदिन होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूककोंडी होते. शिवाय, फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे बघायला मिळते. तर विक्रेते, नागरिक विनामास्क याठिकाणी आढळून येतात. गत काही दिवसांपासून शेकडो ग्राहक भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी होत असल्याने बाजार समितीबाहेर रस्त्याला प्रतिकृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
इन्फो बॉक्स===
प्रशासनाकडून कारवाईची प्रतीक्षा
पेठरोडला आरटीओ कार्यालयाबाहेर मुख्य रस्त्यावर दररोज
सायंकाळी शेकडो भाजीपालाविक्रेते भाजीपाला वाहने उभी करून विक्री करतात. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडतो. रस्त्यावर भाजीविक्रेते कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याने कारवाई होणे अपेक्षित असले, तरी महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.