सायखेडा : पाऊस मुबलक पडल्याने पिके भरघोस निघाली मात्र बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्वच भाजीपाल्याचे भाव घसरल्याने बळीराजाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.जून महिन्यापासून सलग पाच महिने जिल्ह्यातील सर्व भागात जोरदार पाऊस पडला, चार महिने अनेक नदी दूथाडी भरून वाहत होत्या विहिरी काठा पर्यंत भरल्या होत्या, अजूनही अनेक ठिकाणी विहिरीचा तए दिसत नाही इतके मुबलक पाणी आहे. शेतकरी मागील चार वर्ष सलग दुष्काळी परिस्थितीमुळे होरपळून निघाले होते. यंदा चांगला पाऊस पडल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला होता, पिकांना मुबलक पाणी मिळाले. शेतकºयांनी काबाड कष्ट केले. कर्ज काढून पिके उभी केली. त्यामुळे शेतात सोन्यासारखी पिके उभी केली. लाखो रु पये भांडवल शेतीत ओतून पिके बहरून गेली. पीक काढणीसाठी आले आणि शेतमालाचे दर कोसळले. कोबी, फ्लावर, टमाटे, मेथी, शेपू पालक, वांगी, यासारखे नगदी पिके कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली. बहरलेले पीक हाती आले मात्र बेभावात विकण्याची वेळ आली. काळ्या मातीत सोनं पीकविण्यासाठी लाखो रु पये खर्च केला. आज अशा भावात पिकाचा खर्च सुद्दा वसूल होत नाही. त्यामुळे अस्मानी संकटात वाचलेला शेतकरी सुलतानी संकटात सापडला आह.
भाजीपाला दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 12:38 PM