नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्य:स्थितीत थंडी कमी होऊ लागली तरी भाजीपाल्याची आवक कमीच आहे. भाव मात्र वाढलेले आहेत. गेला आठवडाभर जिल्ह्यात थंडीने कहर केला होता. तेव्हापासून बाजारात आवक कमीच आहे.
टोमॅटोची २० किलोची जाळी १७० ते ३५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. वांगी १८० ते ४५०, फ्लॉवर ८० ते २८० तर कोबी ५० ते १४० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहे. कोथिंबीर २३०० ते ७५०० रुपये क्विंटल तर मेथीचा भाव ७०० ते १८०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. डाळिंबाच्या भावातही फारसा परिणाम झालेला दिसत नाही. डाळिंब ७५० ते ३५०० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याचेही बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उमराणे बाजार समितीत लाल कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन रोष व्यक्त करीत लिलाव बंद पाडला.