नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचाने पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपामुळे शुक्रवारी (दि.१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. देशव्यापी संपाला शहर परिसर व संपूर्ण तालुक्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी शेतकऱ्यांमध्ये शेतमाल करणाºया वाहनांचे नुकसान होण्याची भीती असल्याने अनेक शेतकºयांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतीमाल बाजार न नेण्याचा निर्णय घेतल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केवळ ३० टक्केच शेतमाल विक्रीसाठी आला होता. पुणतांब्यातील शेतकºयांनी गेल्यावर्षी १ जूनला पुकारलेल्या शेतकरी संपाला नाशिक जिल्ह्णातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे ३ जूनच्या मध्यरात्री सरकार आणि आंदोलनाच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर शेतकºयांची फसवणूक झाल्याची भावना शेतकºयांमध्ये पसरल्याने संपाची धुरा हातात घेणाºया नाशिक जिल्ह्णातच यावेळी संपाला अनेक भागांतून अत्यल्प तर काही भागांतून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी एकजुटीने संपाची धग सरकारपर्यंत पोहचविणाºया नाशिक जिल्ह्णात शेतकरी संपात एक जुटीचा अभाव दिसून आला असून, संप यशस्वी करण्याची जबाबदारी असलेले शेतकरी नेतेही दुसºया जिल्ह्णात असल्याने आंदोलनात समन्वयाचाही अभाव दिसून आला. दरम्यान, नाशिक जिल्ह्णातील मालेगाव, देवळा, सटणा, विंचूर, चांदवड, मनमाड, निफाड सायखेडा, सिन्नर परिसरासह पेठ, सुरगाणा परिसरातील गोळशी फाट्यावर आंदोलकांनी भाजीपाल्याची वाहने अडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिसरातील वाहने बाजार समितीत दाखल होऊ शकली. बाजार समितीत आलेल्या सर्व कृषिमालाचे लिलाव नियमितपणे सुरू होते. परंतु आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.शेतकरी संघटनांच्या वेगळ्या चुलीगेल्यावर्षी एकजुटीने संपात उतरलेल्या वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी यावर्षी वेगवेगळ्या चुली मांडल्याचे दिसून आले. किसान सभेने शेतकरी कर्जमुक्ती, हमीभाव व वनजमिनी कसणाºया शेतकºयांच्या नावे करण्याची मागणी करीत आंदोलन केले, तर नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने हुतात्मा स्मारकात अभिवादन सभा घेऊन शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या शेतकरी व शेतकरी नेत्यांना अभिवादन केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विभागीय निबंधकांना निवेदन देऊन शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बँकांचे नाव न लावण्याची मागणी केली.
नाशिक बाजार समितीत भाज्यांचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:16 AM