नाशिक : शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तर काहींच्या भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून हे भाव वाढविण्यात आले आहे. पितृपक्ष म्हणजे आपल्या पुर्वजांना स्मरण करून त्यांना विविध पकवनांचा नवैद्य दाखविण्यात येतो. भाद्रपद पोर्णिमेपासुन पितृपक्षास सुरूवात होत असते. त्यामुळे या दिवसांत भाज्यांना मोठी मागणी असते. त्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे भाज्यांचे भाव गगणाला भिडले आहे. भाज्यांमध्ये कारले, आळुची पाने, मेथी, पालक, गवार, वाल, भोपळा यांचे भाव वाढले आहे. १० दिवसांपुर्वी भाज्यांचे भाव आवाक्यात होते मात्र पावसाची सुरूवात होताच मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी याचा फटका भाज्यांवर झालेला दिसून येत आहे. तसेच कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्यामुळे कांद्याचे भावही गगणाला भिडत आहे. त्यामुळे त्यात पितृपक्षाची आता सुरुवात झाली असून अजून १५ दिवस भाज्यांचे दर असेच राहणार असल्याचे विक्रते सांगत आहेत. तसेच पावसाचा जोर वाढला तर भाज्यांच्या भावात असुन वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचा फटका नाशिक जिल्हा पालेभाज्यांसह कांद्याच्या उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांना मोठा फटका बसला होता तेव्हाही भाज्यांचे दर गगणाला भिडले होते. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर दर पुन्हा आवाक्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून त्यामुळे काही भागांतील शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाव वाढविण्यात आल्याचे विक्रेते सांगत आहे.
असे आहे भाज्यांचे दर चवळी : ५० ते ६० रुपये किलो कोथिंबीर जुडी: ७० ते ८० रूपये शिमला मिर्ची : ६० ते ७० रुपये किलो गवार : १०० ते १२० रुपये किलो भेंडी : ४० रुपये किलो मेथीची जुडी : २० रुपये अळुची पाने : १५ ते २० रूपयांना १० पाने कारले : ४० ते ५० रुपये किलो वाल : ४० ते ६० रुपये किलो कांदा : ४० ते ५० रुपये किलो
पुन्हा भाव वाढण्याची शक्यता पावसाचा जोर असाच कायम राहिला तर भाज्यांचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यात पितृपक्षामुळे भाज्यांना मागणी वाढत असून त्याप्रमाणात आवक नसल्यामुळे परिणामी भाव वाढवावे लागत आहे. यामध्ये जवळपास सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहे. विजय डावरे, भाजीविक्रेता