लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने भाजीपाला पिकांला पसंती दिल्याने कोरोनाच्या काळातील भरपाई भरून निघेल अशी आशा निर्माण झाली आहे.रब्बी व खरीप हंगामात कोणत्याही पिकाला हमी भाव न मिळाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर दु:खाची छाया निर्माण झाली आहे. त्यातून भर निघण्यासाठी तालुक्यातील परमोरी, लखमापूर, दहेगाव वागळुद ओझरखेड, म्हेळुसके आदी परिसरातील भागातील शेतकरी वर्गाने आपला शेतीतील कल बदलावत शेतामध्ये वांगी, फ्लॉवर, कोबी, मिरची, कोथिंबीर, लसूण इ.भाजीपाला लागवडीला पसंती दिली.सुरु वातीच्या काळात वातावरणातील बदलावाचा व पावसाच्या लहरीपणाचा भाजीपाला पिकांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाच्या रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर दिसण्यास सुरु वात झाली. अनेक महागड्या औषधांची वेळोवेळी फवारणी करावी लागली.दरम्यान परतीच्या पावसाने तर कहर करीत श्ोतकऱ्यांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले. आता एवढे महाग भाजीपाला बियाणे खरेदी करून पावसाने वाया जाते की काय? अशी भीती निर्माण झाली होती. परंतु मोठ्या पावसात या भागातील शेतकºयांनी आपल्या शेतामधील भाजीपाला पिकांवर लक्ष केंद्रित करून ते वाचविण्यासाठी जीवाचे रान केले.दोन्ही हंगामात कोणत्याही पिकाला हमी भाव न मिळाल्याने हतबल झालेल्या शेतकरी वर्गाला भाजीपाला पिक आधार देईल अशी आशा निर्माण झाली आहे. कारण सध्या वांगी, फ्लॉवर, मिरची इ. भाजीपाला बहर धरीत असून यावरील शेतकºयांच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. यातून पुढील हंगामासाठी नगदी भांडवल तयार होईल अशी चित्रे सध्या दिसत आहे.दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे वांगी पिकाला शेतकºयांनी पसंती देऊन अनेक कष्टांतुन हे पिक उभे केले आहे. आम्ही दोन्ही हंगामात काही पिके घेतली. त्यात द्राक्षे पिकांची पुर्णपणे वाट लागली, काही नगदी भांडवल मिळून देणारे पिके घेतली. परंतु त्यातही कोरोनामुळे कवडी मोल भाव मिळाला. जे भांडवल होते. तेही खर्च झाले. मात्र उत्पन्नाची सरासरी काहीच मिळाली नाही. त्यातून आम्ही नवीन वांगी शेतीत लागवड केली. त्यातून आम्हाला पुढील हंगामासाठी नगदी भांडवल तयार होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.- अनिल दिघे, शेतकरी परमोरी.
बळीराजांला भाजीपाल्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 8:18 PM
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने भाजीपाला पिकांला पसंती दिल्याने कोरोनाच्या काळातील भरपाई भरून निघेल अशी आशा निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देवडांगळी : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष